Ukhane| Marathi Ukhane

  • "बरेच दिवसांनी आकांक्षा आज झाली साकार,
    ...... रावांनी केलाय माझा पत्नी म्हणुन स्विकार."
    (..... रावांनी करावा घासाचा स्विकार)


  • भुंग्याच्या सहवासात विकसते कळी,
    ...... रावांचे नाव घेते .....च्या वेळी.

    "मंगळ सुत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरचा संगम,
    ......रावांच्या सहवासाने आज झाला सौभाग्याचा उगम."

    असावे नेहमी हसतमुख बोलावे नेहमी गोड,
    ......रावांच्या संसाराला वी लाभली जोड.

    भुंग्याच्या सहवासात विकसते कळी
    ......रावांच्या साक्षीने लिहिते सौभाग्याच्या ओळी.

    विद्येचा नसावा अभिमान पैशाचा नसावा गर्व,
    ......रावांच नाव घेते ऐकत आहाना सर्व.

    सौभाग्याचे लेणे आहे काळी पोत,
    ......रावांच्या जीवनात उजळते जीवन ज्योत.

    पॉलीस्टरचा कपडा कात्रीने कापला,
    ......रावांच्या जीवनात मला आनंद वाटला.

    कौतुकी सासु-सासरे, हौशी नणंद,
    ......रावांचे नाव घेतांना होतो खुप आनंद. 

    गुलाबाचं फुल दिसायला ताजं,
    ......रावांचे नाव घेते सौभाग्य माझं.

    कांजीवरम साडी बनारसी खण, 
    ......रावांचे नाव घेते आज आहे. ..... सण. 

    प्रतिमेच्या अविष्कारातून काव्य बहरे, 
    ......रावांच्या साथीने मन माझे मोहरे. 

    विचाराने सरळ मनाने निर्मळ... राव मला लाभले, 
    ......सुर ताल मिलाल्याने जीवनी स्वर्ग अवतरले. 

    प्रांजळपणे बोलने मन मोकळे हसने, 
    ......रावांच्या सहवासात कशाला हवे रुसने? 

    कर्ता करविता परमेश्वर त्यावर टाकते भी भार, 
    ......रावांचे नाव घेते कर देवा नौका पार 

    सात पावलांनी केली संसाराची नांदी, 
    ......रावांच्या संसारात राहील आनंदी. 

    कळत नाही माझेच मला, आहे स्वप्न की भास,
     ......रावांचे नाव घेते तुमच्या साठी खास. 

     भवसागरात तरंगते संसाररूपी होडी, 
    लक्ष्मीच्या कृपेने सुखी राहो... व... ची जोडी. 

    विनय हाच खरा स्त्रीचा अलंकार, 
    ......रावांच्या सहवासात होवो ध्येय-आशा साकार. 

    एकनाथाच्या घरी हरी पाणी भरतो कावडीने, 
    ......रावांचे नाव मी घेईन आवडीने. 

    भवसागरात तरंगते संसार रुपी नौका, 
    ......रावांचे नाव घेते सर्व जणी ऐका.

    लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी, 
    ......रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा साठी. 

    विशाल सागराला भेटण्याकरीता खळखळत जाते सरीता, 
    ......रावांचे नाव घेते तुमच्या करीता. 

    संसार रुपी कादंबरीत रेखल्या भावनेच्या ओळी, 
    ......रावांचे नाव घेते... च्या वेळी. 

    यौवनात पदार्पन केले सरले माहेरचे अंगण, 
    ......रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण. 

    नेत्रीच्या निरांजनात तेवते प्रीतीची फुलवात, 
    रावांच्या साथीने संसाराला करते सुरुवात. 

    गुडीपाडव्याच्या सणाला पुरण पोळीचा मान 
    रावांच्या सहवासात विसरते मी भुक तहान. 

     
    गणपतीला दुर्वा शिवाला बेल,  
    ... रावाच्या संगतीत बहरली संसार रूपी वेल, 

    हौशी आहे  नणंद, प्रेमळ आहे जाऊ, 
    रावांच्या गुणांचे गोडवे किती गाऊ. 

    शितल आहे चांदने वारा वाहे मंद,
     ... रावाना सिनेमाचा भारीच छंद. 

    फुलला पळस रानोरानी, मोहरला आंबा पानोपानी, 
    .. राव माझे धनी मी त्यांची अर्धागिनी.

    वसंत ऋतुच्या आगमनाला कोकीळा गाते गाणी, 
    अर्पण करते आयुष्य... रावांच्या चरणी. 

    पित्याने दिली विद्या मातेने दिले गृहशिक्षण, 
     ... राव मिळाले हेच माझे भुषण, 

    नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी, 
    ...रावांचे नाव होते ओठावरती पण, थांबले होते अखण्यासाठी.  

    माहूर गडावर रेणुकेची वस्ती, 
    रावांना मिळावे आयुष्य माझ्यापेक्षा जास्ती. 
     
    वैचारीक प्रगल्भतेचे... राव मला लाभले. 
    म्हणुन जीवनी स्वप्न माझे साकारले. 
     
    पती-पत्नी असतात सुख दुःखाचे साथी, 
    रावांचे नाव घेते जगदंबे, वरद हस्त असुदे माथी..

Comments